प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेत राडा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रजासत्ताकदिनी शुक्रवारी (दि.२६) नगर तालुक्यातील सोनेवाडी आणि नागरदेवळे येथे ग्रामसभेत देान गटात वादावादी होवून त्याचे पर्यावसन हाणामारी आणि दगडफेकीत झाले. याबाबत नगर तालुका आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केंद्र व राज्य सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण करीत गावागावात ग्रामसभांना मोठ्या प्रमाणात अधिकार प्रदान केले आहेत. वर्षभरात स्वातंत्रदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती या चार ग्रामसभा सक्तीच्या केल्या आहेत. शुक्रवारी, दि. २६ नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास) आणि नागरदेवळे या गावातील ग्रामसभेत दोन गटात शाब्दीक बाचाबाची होवून त्याचे पर्यावसन हाणामारी आणि दगडफेकीत झाले.

सोनेवाडी येथे सकाळी ११ वा. मारुती मंदिरासमोर ग्रामसभा सुरु झाली. यावेळी सरपंचानी माजी उपसरपंच गोरख दळवी यांना ग्रामपंचायतीची थकबाकी भरण्यास सांगितले. त्यावरुन ग्रामसभेत वादावादी झाली. गोरख दळवी यांनी सरपंचाच्या दिशेने दगड फेकुन मारला. मात्र त्यांनी तो हुकविला. त्यानंतर वाद चिघळल्याने गोंधळ सुरु झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत उपसरपंच नितीन उत्तम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात गोरख जगन्नाथ दळवी, जालिंदर सुभाष दळवी, रामनाथ संपत कराळे, रावसाहेब जयवंत कापसे, राहुल चंद्रकांत लष्करे, राहुल झुंबर कांबळे, अभिजीत बबन गुंजाळ, सागर अंकुश दळवी, अमोल अंकुश दळवी, शुभम महादेव सुंबे, ऋतिक भैरवनाथ कराळे, महादेव रंगनाथ सुंबे, यांच्या विरुध्द भादवि कलम १४३, ३२३, ५०४, ५०६, मुंबई पोलिस ॲक्ट ३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच नागरदेवळे ग्रामसभेत सुरवातीपसाूनच गोंधळ सुरु झाला. याची माहिती समजताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस पथक, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तेथे पेालिसांसमोरच हाणामारी आणि दगडफेक सुरु होती. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पाचारण करण्यात आला. तेव्हा दगडफेक व हाणमाऱ्या करणारे पसार झाले. याप्रकरणी पो.कॉ. संदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आसिफ आयुब पठाण, चॉंद शेख, बालाजी चौधरी, शिवाजी तुळशीराम चौधरी यांच्या विरुध्द कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.