मतदारसंघात निधी कमी पडणार नाही : आ.राजळे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघात तीनशे गावे आहेत. प्रत्येक गावात विकासाची गंगा घेवून जाण्याचा माझा प्रयत्न आहे. जलयुक्त शिवार योजना, कर्जमाफी व मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत.यापुढील काळात मतदारसंघात विकासाच्या कामाला निधी कमी पडु देणार नाही. असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माणिकदौंडी येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या कामाचा भूमीपुजन कार्यक्रमात राजळे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.छगन महाराज मालुसरे होते. जिल्हा परिषदेच्या सदस्या ललिता शिरसाठ, राहुल राजळे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समितीचे सदस्य व गटनेते सुनील ओव्हळ, सरपंच प्रल्हाद राठोड, रावसाहेब मोरे, विजय मंडलेचा, गोकुळ दौंड, नवनाथ चितळे, सुंदर चव्हाण, बाबासाहेब बोरसे, भाऊसाहेब जिवडे, चाँद मौलाना, शिवाजी मोहीते, शिवनाथ मोरे, दिनकर गर्जे, काकासाहेब शिंदे, सुभाष केकाण, राधाकिसन कर्डिले, नवनाथ चव्हाण, उद्धव माने,आलमगीर पठाण, पोपट पठाण, मधुकर धावड, अशोक कांबळे,संतोष आंधळे आदी उपस्थीत होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या की, माणिकदौंडी व परिसरातील गावामधे अनेक विकासाची कामे करावयाची आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. माणिकदौंडी ते जाटदेवळे हा साडेचार कोटी रुपयंची रस्त्याचे कामे करण्यात येतील. आल्हणवाडी ते खांडकेवस्ती हा सव्वाकोटी रुपयाचा रस्ता मंजूर झाला आहे. माणिकदौंडी परिसरातील पिण्याच्या पाण्यासाठीच्या योजनेचे प्रस्ताव दाखल आहेत त्याला लवकरच मंजुरी मिळेल. विकासाच्या योजनांचा पाठपुरावा करुन पदाधिकारी व लोकप्रतिनिधी योजना मंजूर करतात. काम लवकर झाले पाहीजे, त्याचा फायदा वेळेत जनतेला मिळाला पाहीजे. पाणी योजनेचे कामही तातडीने व दर्जेदार झाले पाहीजे अशी प्रशासनाकडुन अपेक्षा व्यक्त केली..

मतदार संघात सुमारे अडीचशे ते तीनशे गावे आहेत. प्रत्येक गावात विकासाची कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. रस्ते, स्माशनभूमी व कब्रस्थानच्या सरंक्षकभिंती, सभामंडप आदि कामाची मोठी मागणी आहे. त्यासाठी निधी देण्यात येईल. केंद्र व राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजना, कर्जमाफी, मुख्यमंत्री सडक योजना यामधून मतदार संघात विकासाची व शेतकरी हिताची कामे केली आहेत. आणखी कामे करावयाची आहेत. माणिकदौंडी परीसरातील वाड्यावस्त्या व लमाणतांडे येथे पिण्याचे पाणी, रस्ता व जलसंधारणाची कामे प्राधान्याने मार्गी लावु. प्रस्ताविक सुनील ओव्हळ यांनी केले. राजीव सुरवसे यांनी सुत्रसंचालन केले. समीर पठाण यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.