गट - तट एकत्र करून राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार - खा. शरद पवार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केंद्र व राज्यातील भाजप सरकार म्हणजे लबाडाचे आमंत्रण असून, जेवल्याशिवाय खरे मनू नका,या सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. अशी टीका देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केली. शेतकरीविरोधी भाजपा सरकारच्या विरोधात राष्टवादी पक्ष एकसंघ करून, बळीराजाचे राज्य आणणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी केले. पारनेर तालुक्यातील वासुंदा येथे स्व.माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कर्जमाफी हे लबाडाचे आमंत्रण !
 यावेळी पवार म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार हे शतकारी विरोधी असून, नुसत्याच घोषणा करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. सरकारची कर्जमाफी ही फसवी असून, हे लबाडाचे आमंत्रण असल्याची टीका त्यांनी केली.

गट - तट एकत्र करून राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार 
सध्या जिल्हा व तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये गट -तट दिसत असून आम्ही आत म्हातारे झालो आहोत, त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी पक्ष तरूणांना संधी देणार असल्याचे सांगत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी तरुण नेत्यांनाही डोहाळे लागले असून, आम्ही म्हातारे असलो तरी नांगरट चांगली करतो. त्यामुळे राष्टवादी बरोबर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शेतकरी कल्याणासाठी पवार साहेबांचे धोरण महत्वाचे -  वळसे
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिलीपराव वळसे म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव झावरे यांनी दुष्काळी जनतेला समोर ठेवून, राजकारण व समाजकारण केले. त्यांच्या काळात त्यांनी शेतकरी केंद्रस्थानी मानून तालुक्याचा विकास केला. शेतकरी कल्याणासाठी पवार साहेबांचे धोरण महत्वाचे असल्याचे सांगत भाजपा सरकारने नोटबंदी आणत उद्योगधंद्यांना अडचणीत आणले आहे. यामुळे बेरोजगारीची समस्या वाढत असून, हे सरकार जाती जातीत फूट पडून सामाजिक एकता धोक्यात आणत असल्याचा आरोप वळसे यांनी केला. .

शरद पवार यांच्या मागे उभे राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा - पिचड
मधुकर पिचड म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.त्यामुळे शरद पवार यांच्या मागे उभे राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

पराभवानंतर खचून न जाता नव्या दमाने जनतेच्या सुख दु:खात वाटेकरी -  झावरे
प्रास्तविकात सुजित झावरे यांनी तालुक्यात कोट्यवधींची कामे करूनही स्वर्गीय वसंराव झावरे यांनी कधी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. दादांनी अनेक माणसे मोठी केली. ती माणसे निघून गेली, तरी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. मी ही पराभवानंतर खचून न जाता नव्या दमाने जनतेच्या सुख दु:खात वाटेकरी होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी असून, राष्ट्रवादीला फक्त राष्ट्रवादीच हरवू शकते, आणि हीच खंत पारनेर तालुक्यात आहे.

यावेळी माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी आ.दादा कळमकर, युवक राष्ट्रवादीचे संग्राम कोते आदींची भाषणे झाली. भुसे यांनी धनगर समाजाचा पारंपरिक वेष परिधान करत पवारांचा सत्कार केला. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय वसंतराव झावरे यांच्या नावाने सभागृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन अशोक चेमटे यांनी केले तर आभार वसुंदाचे सरपंच प्रताप झावरे पाटील यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.