ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍यांचा दुरोपयोग करणार्‍या माजी सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यावर कारवाईची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गावातील मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचे खोटे कारण सांगून, ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या घेवून जिल्हा परिषदेत चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाची चौकशीची तक्रार करणार्‍या माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर स्वाक्षरीचा दुरोपयोग व जि.प. प्रशासनाची दिशाभूल केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मौजे इसळक ग्रामस्थांनी केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या मागणीचे निवेदन जि.प. उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) प्रशांत शिर्के यांना देण्यात आले. यावेळी सरपंच रावसाहेब गेरंगे, चंदू खामकर, शरद वाबळे, रावसाहेब गेरंगे, रमेश गेरंगे, विकास गेरंगे, जालिंदर चव्हाण, संजय चोथे, शरद गेरंगे, बाळू गेरंगे आदि उपस्थित होते. नगर तालुक्यातील मौजे इसळक गावामध्ये चौदावा वित्त आयोगांतर्गत चिंचोला संप ते गेरंगेवस्ती व गेरंगेवस्ती ते सखाराम खामकर वस्ती दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सन2016-17 मध्ये करण्यात आले. सदरची पाईपलाईन अंदाजे पंधराशे मीटरची झालेली असून, सर्व ग्रामस्थांना चांगल्या पध्दतीनी पाणीपुरवठा होत आहे. 

सदरच्या कामाबाबत ग्रामस्थांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना गावातील माजी सरपंच संजय गेरंगे, उपसरपंच अमोल शिंदे व ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब गेरंगे यांनी गावातील रानडुकरे यांच्या बंदोबस्तासाठी सामाजिक वनीकरण विभागाला अर्ज करावयाचा असल्याचे सांगून, ग्रामस्थांच्या सह्या घेतले व चौदाव्या वित्त आयोग कामाच्या चौकशीची तक्रार जिल्हा परिषदेत केली. वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्‍न या योजनेमुळे सुटला आहे. या कामाची कोणतीही तक्रार नसताना संबंधीत पदाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या सह्यांचा गैरवापर केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ग्रामस्थांच्या सह्यांचा गैरवापर करणार्‍या व जि.प. प्रशासनाची दिशाभुल करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी इसळक ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांना देखील देण्यात आले. सदर मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.