पोलिसांच्या हप्तेखोरी विरुद्ध बेलवंडीत “भिक मांगो’

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्‍यात बेलवंडी येथील पोलीस प्रशासनाच्या मुकसंमतीने सुरू असलेल्या वाळूचोरी विरोधात अनोखे “भिक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा बेलवंडीमधील तरुणांनी दिला आहे. तालुक्‍यातील बाजारात भीक मागून गोळा होणारी रक्कम पोलीस अधीक्षकांना हफ्ता म्हणून देऊन वाळूचोरी रोखण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन हे आंदोलन करणार असल्याचे या तरुणांनी सांगितले. बेलवंडीत गेल्या कित्येक महिन्यांपासून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. या अवैध वाळु उपशाला पोलीस प्रशासनाचा पाठिंबा लाभत आहे. पोलीस हप्तेखोरीमुळे वाळूचोरीविरुद्ध कारवाई करीत नाहीत. याला कंटाळून बेलवंडीतील काही तरुणांनी एकत्र येत वाळूचोरी आणि पोलिसांची हप्तेखोरी रोखण्यासाठी अनोखे “भिक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बेलवंडीतील हे तरुण तालुक्‍यातील बाजारात भिक मागून गोळा होणारी रक्कम पोलीस अधीक्षकांना हफ्ता म्हणून देणार आहेत.या हप्त्याच्या बदल्यात वाळूचोरी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. पोलीस प्रशासन आता तरी हप्तेखोरी थांबवून वाळूचोरी विरोधात कारवाई करेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र वाळूचोरी आणि पोलीस प्रशासनाची हप्तेखोरी याबाबींना वाचा फोडण्यासाठी तरुणांनी निवडलेल्या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंग आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.