नाशिक-पुणे महामार्गवर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जुन्या नाशिक-पुणे महामार्गावरील प्रसाद लॉज समोर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकी चालक जागीच ठार झाला.ही घटना शनिवारी दुपारी घडली. कृष्णा खंडेराव पारधी (वय. २५ रा. शिवापूर, कोकणगाव, ता. संगमनेर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. ट्रकचालक भरधाव वेगाने जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परराज्यातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.