पो.निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना राष्ट्रपती पदक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील शेतकरी कुटुंबातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे तालुक्याचा राज्यात नावलौकिक वाढला आहे. सध्या ते मुंबई येथे गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वाघ हे सन १९९५-९६ साली नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतून ६४५ उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी त्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी व मानाची तलवार देऊन सन्मानीत करण्यात आले होते. आपल्या २३ वर्षांच्या गुणवत्तापूर्वक सेवेमध्ये त्यांना २२९ बक्षिसे, नऊ अर्धशासकीय प्रशंसापत्र व पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे.

२६ नोेव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरातील दहशतवादी हल्ल्यासंबंधी उत्कृष्ट काम केल्याने त्यांना राज्य शासनाकडून १५ हजार रूपये व साडेसहा कोटी रुपयांच्या हिरे चोरी प्रकरणाचा छडा लावल्याप्रकरणी त्यांना २० हजार रूपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सन २०१५-१६ या कालावधीत त्यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेच्या उत्तर अमेरिका खंडातील हैती या देशात शांतीदूत म्हणून काम करून संयुक्त राष्ट्र परिषदेचे पदक प्राप्त केले आहे.

मुंबई विद्यापीठातून २००९ व २०११ यावर्षी अनुक्रमे एल.एल.बी. व एल.एल.एम. हे अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यामध्ये विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करत असताना अशी कामगिरी करणारे ते एकमेव अधिकारी ठरले. त्यांच्या विधी अभ्यासक्रमातील यशासाठी त्यांना वाय. व्ही. चंद्रचूड पारितोषिक देऊन गौरविण्यात आले..

या व्यक्तीरिक्त नोकरी करत असताना त्यांच्या नावे २०११ साली मुंबई विद्यापीठ अष्टपैलू कामगिरी करण्याकरिता राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक पटकाविण्याचा विक्रम आहे. त्यांनी २०११-१३ या कालावधीत डिस्टीक्शनसह एम.बी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. 

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून भरविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मानवी हक्क या विषयावरील राज्य पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी सन २०१५ व २०१८ मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या २३ वर्षांच्या सेवेतील अनुभव, शैक्षणिक उपलब्धी व कायद्याचे सखोल ज्ञान या जोरावर मुंबई पोलीस दलात अत्युत्कृष्ट कामगिरी करून मानाचे स्थान कमाविले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.