कांदा विक्रीतून पारनेरमधील शेतकरी बनले 'लखपती'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर कृषी उत्पन्­न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच विक्रमी उलाढाल होऊन गेल्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांना कांदा उत्पादनातून सुमारे १०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागीलवर्षी शाश्वत पाण्याच्या जोरावर मोठया प्रमाणात कांदा लागवड केली होती. त्यामुळे पारनेर कृषी उत्पन्­न बाजार समितीमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, २४ जानेवारी २०१८ अखेर सुमारे ३ लाख ३१ हजार ६९७ क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना १०० कोटी रुपये मिळून शेकडो शेतकरी 'लखपती' झाले आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेतीतील खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही, म्हणून शेती फायद्याची नाही, असे म्हणून शेती करायचीच नाही, असा नकारात्मकतेचा सूर सतत कानी पडत असतो. मात्र, त्याच शेतीतून अवघ्या तीन महिन्यांत कांदा उत्पादनातून शेतकरी लखपती होऊ शकतो, याचा प्रत्येय अनेक शेतकऱ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात आला. नोव्हेंबर २०१७ या महिन्यात सुमारे ५६ हजार ७१९ क्­विंटल कांदा आवक होऊन सरासरी-३२२५ रुपये प्रतिक्­ क्विंटल, असा भाव मिळून सुमारे १५ कोटी २३ लाख १३ हजार ८३५ रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडली आहे. 

डिसेंबर महिन्यात सुमारे १ लाख ५८ हजार ७३ क्विंटल कांद्याची आवक होऊन सरासरी ३१५० रुपये प्रतिक्विंटल, असा भाव मिळनू सुमारे ४३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६८७ रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत. जानेवारी २०१८ या महिन्यात सुमारे १ लाख १६ हजार ८८५ क्विंटल कांद्याची आवक होऊन सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटल, असा भाव मिळून सुमारे ३५ कोटी ३७ लाख ७० हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत.

पारनेर बाजार समितीचा नावलौकिक वाढला
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याची आवक व दराबाबतची माहिती तालुक्­यातील कांदा उत्पादक शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थांचे संचालक, व्यापारी आणि दुकानदार अशा तब्बल सहा हजार लोकांना मोबाईल संदेशद्वारे दिली जाते. याचा परिणाम तालुक्यातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी पारनेर बाजार समितीत आणत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत आल्याबरोबर वजन होऊन वजनाची पट्टी शेतकऱ्यांना मिळते तसेच प्रत्येक मालाचा जाहीर लिलाव होतो.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.