निळवंडे कालव्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात : आ.कर्डिले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना निळवंडे धरणाच्या कालव्याचे पाणी मिळण्यासाठी आपला पाठपुरावा अंतिम टप्प्यात असून लवकरच ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या परीसरात शेतकऱ्यांचा भव्य मेळावा घेणार आहे. मंत्रीपद नको, परंतु पण निळवंडे कालव्याचे काम पुर्ण करा, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ४ कोटी पन्नास लक्ष रुपये किंमतीच्या १० कि.मी. रस्त्याच्या भूमीपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर कदम होते. भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, मधुकर लोंढे, सरपंच अमोल भनगडे, रभाजी सुळ, संचालक के.मा.कोळसे, सोपान हिरगळ, सरपंच दामोधर संसारे, उपसरपंच रविंद्र गागरे आदी उपस्थित होते.

आ. कर्डिले पुढे म्हणाले की, निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नाही. शिर्डी संस्थानच्या माध्यमातूनही कालव्यासाठी निधी प्राप्त होणार असून जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत मेळावा घेवून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. वडनेर, कानडगाव, तूळापूर, निंभेरे, आदी गावांना सदरचा रस्ता अतिशय उपयोगी ठरणार आहे. कुरणवाडी पाणी योजना सध्या सुरळीत झाली. यासाठी जनतेचे लुटलेले पैसे देवून पुन्हा माघारी घेतलेल्यांनी मात्र खूप कौतुक करवून घेतले. बोलण्यासाठी कोणताच विषय नसल्याने के.के.रेंजचा मुद्दा पुढे करत आहेत. मात्र कुणाच्या काळात हा प्रश्न निर्माण झाला याचा विचार करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची गुंठाभरही जमीन जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.