पथदिवे घोटाळाप्रकरणी शिवसेना आक्रमक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरात गाजत असलेल्या प्रभाग एक व २८ मधील पथदिवे घोटाळाप्रकरणी सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करा; अन्यथा आयुक्तांच्या दालनातच उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल राठोड यांनी दिला. त्यावर आयुक्त घनश्याम मंगळे यांनी स्वत:च गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शहरातील प्रभाग एक व २८ मधील पथदिव्यांच्या कामात सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आणला होता. त्यानंतर बजेट रजिस्टर सभेत मागवून कामांना मंजुरी दिली किंवा नाही याची शहानिशा करण्यात आली होती. त्यावेळी बजेट रजिस्टरमध्ये बिले काढलेल्या कामांच्या नोंदी नसल्याचे समोर आले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेतही याच मुद्द्यावर गोंधळ झाला होता. अधिकारी व नगरसेवकांत शाब्दिक चकमक होऊन अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले होते. तहकूब सभा दोन दिवसांनी घेण्यात आली, त्यावेळी आयुक्त घनश्याम मंगळे उपस्थित होते. त्यांनाही सभागृहाने या प्रकरणात धारेवर धरीत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.