९ अट्टल गुन्हेगार गजाआड नगर व शेवगाव पोलिसांची कारवाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नऊ अट्टल गुन्हेगार गजाआड करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून विविध प्रकारची मोठे गुन्हे उघडकीस येणार असल्याचा पोलिसांचा कयास आहे. नगर व शेवगाव पोलिसांच्या कारवाईत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ३ जणांना धारदार शस्त्रांसह नगर तालुका पोलिसांनी वाळुंज ते अरणगाव बायपास रोडवर मोठया शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.२४) रात्री करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, बायपास रोडवर वाळुंज शिवारात ६ जण दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा बसून धरले असल्याची माहिती मिळाली.

त्यानूसार पोना. साबीर शेख, पोना. आनंद सत्रे, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ. संदीप जाधव, योगेश ठाणगे यांच्या पथकाने चाच्या पाच्या भोसले, अमोल चाच्या भोसले (दोघे रा. सय्यद मिर लोणी, ता. आष्टी, जि. बीड), जेरु भगवान भोसले (रा. खुंटेफळ, ता. आष्टी, जि. बीड) यांना अटक करुन त्यांच्याकडून चाकू व पहार असे घातक शस्त्र जप्त केले आहे. दरम्यान यातील तीन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या तीन आरोपींचा पेालिस शोध घेत आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोना. आनंद सत्रे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोसई क्षीरसागर हे करत आहेत.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.