साई मंदिर परिसरातून चपला चोरीतून रोजची हजारोंची कमाई !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षभरात काही कोटी भाविक साईबाबा मंदिराला भेट देतात.यात सर्व सामान्यांबरोबर गर्भश्रीमंतही समाधीपुढे नतमस्तक होऊन जात असतात यातील व्ही.आय.पी.च्या व श्रीमंतांच्या पायातील नामांकित कंपन्यांच्या चप्पल व बूट चोरणारी चोर मंडळी मंदिर परिसरात वावरु लागली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याची बारीकसारीक माहिती सुरक्षा रक्षकांना असतानाही इतर चोरी पेक्षा चप्पल चोरीचा आरोपाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा नाही या दृष्टीकोनातून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या चोरीचे नेटवर्क लगतच्या जिल्ह्यात असून दररोज गोणी भरून चप्पला व बूट चोरी होत आहेत. मंदिराच्या सुरक्षेचा कारभार डी.वाय.एस.पी.दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आहे. हा प्रकार थांबण्यासाठी त्यांनीच आता कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

दर्शनासाठी आलेल्या व्ही.आय.पी.च्या व श्रीमंतांच्या पायातील नामांकित कंपन्यांच्या जोड २ हजार ते १० हजारच्या दरम्यान असतात याचा बारीक अभ्यास असलेली व चोरीची मोडस ठरलेले संशयित गर्दीतून येत कधी ओट्यावर बसून तर कधी नामस्मरणाचे नाटक करतात.डोक्याला टीळा लावून काही जण तर आपण साईभक्तच आहोत असा देखावा करतात. या रुपात हे तरुण आपला हेतू सहजपणे साध्य करतात.

महागाईच्या काळात हजार ते पाचशे रुपये कमविणे अवघड झाले असताना यांच्या कमाईचे आकडे मात्र चारआकडी झाले आहेत. याला महिलाही अपवाद नसून ज्याठिकाणी चांगल्या चप्पला बूट आहेत त्याठिकाणी ८ ते १० वर्षाचा मुलगा किंवा मुलगी यांना सोडून द्यायचे जणूकाही ते अंध असल्याचा आभास निर्माण करून ज्याठिकाणी काठी टेकविली जाईल तेच जोड हे लहन मुले उचलून गोणीत टाकून चोरून नेतात.

भक्तांना दर्शनानंतर बाहेर आल्यानंतर आपले महागडे चप्पल-बूट चोरी गेले आहे हे लक्षात येते. साईबाबांच्या मंदिरात 'साडेसाती गेली' असे भावनिक शब्द फेकणारेही लोक तिथेच उपस्थित असतात. साईभक्तही नशिबाला दोष देत आपल्या गावाकडे निघून जातात.

पोलीसही या चोरीकडे दुर्लक्ष करतात. चोरणारे पकडून दिले तरी पोलीस त्यांना गजाआड करीत नाहीत. याचे शल्य माफक पगारावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आहे. या टोळीचे व चोरीचे नेटवर्क पकडून त्यांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान मंदिर सुरक्षेबरोबरच पोलिसांसमोर उभे आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.