संगमनेर तालुक्यात चार दिवसांत तीन बिबट्यांचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : संगमनेर तालुक्यातील मुंजेवाडीत बिबट्याची जोडी मृतावस्थेत आढळल्यानंतर वरुडी पठार शिवारात बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळली. चार दिवसांत एकूण तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या बिबट्यांचा मृत्यू उपासमारीने न्युमोनिया होऊन झाल्याचा वन विभागाचा अंदाज असला, तरी यासंदर्भात वनविभागाने अधिकृत खुलासा केलेला नाही. मुंजेवाडी शिवारातील संदीप देवकर या शेतकऱ्याला मृतावस्थेतील बिबट्या आढळल्यानंतर जवळच्याच दुसऱ्या एका शेतात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. 

एकाच दिवशी दोन बिबटे मृतावस्थेत आढळल्यानंतर आता आणखी एक मादी बिबट्या मेलेली आढळल्याने या परिसरात बिबट्यांचे होणारे मृत्यू संशोधनाचा विषय ठरले असून त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. परिसरात बिबट्यांचा अधिक संख्येने वावर असल्याने वन विभागाने सतर्कतेने या बिबट्यांच्या मृत्यूची कारणे शाेधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.