माहेरहून सासरी निघालेली विवाहिता आठवडा उलटूनही सासरी पोहोचली नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : माहेरहून सासरी निघालेली विवाहिता घरी न पोहोचल्याने तिच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. सविता अंकुश राऊत (४०) ही महिला १७ जानेवारीला राहुरी येथे माहेरी आली होती. 


१८ ला देवळाली प्रवरा येथे सासरी जाते, असे सांगून सविता बाहेर पडली. मात्र, आठवडा उलटूनही ती सासरी पोहोचली नाही. सासर व माहेरच्या मंडळींनी सविताचा शोध घेतला, मात्र तो व्यर्थ ठरला. सविता ही राहुरीतील खासगी दवाखान्यात कामाला होती. अंकुश राऊत यांनी पत्नी हरवल्याची खबर पोलिसांना दिली असून तपास हवालदार अशोक गायकवाड करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.