बचत खात्यातून फसवणूक करून पैसे काढल्याची तक्रार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फसवणूक करून पैसे काढल्याची तक्रार खर्डा येथील खातेदार सलीम अब्दुल गफूर शेख यांनी झोनल ऑफीस, पुणे व मुंबई मुख्य व्यवस्थापकांकडे लेखी स्वरूपात केली आहे.जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे सेंट्रल बॅंकेची शाखा आहे. या बॅंकेत खर्डा व परिसरातील 27 हजारांच्या आसपास खातेदारांचे खाते व इतर ठेवी आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तक्रारीत म्हटले आहे की, 15 एप्रिल 2017 रोजी माझ्या बचत खात्यातून बनावट सही करून कोणीतरी 50 हजार रुपये व 4 मे 2017 रोजी 50 हजार असे मिळून एकूण एक लाख रुपये काढून आपली फसवणूक केली आहे. पैसे काढण्याच्या स्लीपवरील हस्ताक्षर व सहीही आपली नसून ती बनावट असल्याचे सलीम यांचे म्हणणे आहे. तसेच, पैसे काढलेल्या त्या स्लीपवर वडिलांचे नाव चुकलेले आहे. 

सलीम अब्दुल गफूर शेख ऐवजी सलीम अबुबकर शेख असे दोन वेळा पैसे काढताना नाव चुकलेले आहे. तसेच, पॅनकार्ड सलीम यांच्याकडे उपलब्ध नाही. पासबुकवर पैसे काढल्याची नोंद नाही. असे असताना पैसे बॅंकेने दिलेच कसे, असा सवाल सलीम यांनी केला आहे. बॅंकेने या दोन दिवसाचे सी.सी.टी.व्ही फुटेज काढून मला न्याय द्यावा, अशी मागणी सलीम शेख यांनी केली आहे. 

त्यांनी जामखेडचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून पैसे काढणारा खरा चोर कोण हे शोधून काढणे बॅंकेपुढील खरे आव्हान आहे. लोकांच्या असंख्य ठेवी असलेल्या या राष्ट्रीयीकृत बॅंकेची विश्‍वासार्हता धोक्‍यात येऊ नये म्हणून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.