जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पदाचा दुरोपयोग करुन 137 एकर जमीन हडप करणार्‍या महसुल अधिकारी, कर्मचारी, एजंट व बनावट खरेदीखत करुन देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील शेतकर्‍यांनी आमरण उपोषण सुरु केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मौजे ढवळपुरी येथील गट नंबर 566, 560/1, 560/2 या सातबारा उतार्‍यावरील लक्ष्मी नारायण देव (विष्णू मंदिर) हे नाव अचानकपणे कमी करुन, बेकायदेशीररित्या फेरफार करुन 137 एकर जमीन लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महसुलचे उप विभागीय अधिकारी गोविंद दाणेज हे हजर झाल्यापासून मंडल अधिकारी व तलाठी यांना हाताशी धरुन बेकायदेशीरपणे फेर टाकून त्यामध्ये खाडाखोड करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.

श्री लक्ष्मी नारायण देव विष्णू मंदिर संस्थानवर खेड वहिवाटदार परत विष्णू शास्त्री, गुरुशास्त्री, गुरुबाळ शास्त्री 1012 व 1019 हे फेरफार रद्द करुन पद्मनाथ शास्त्री हे फेर टाकून डोळ्यात धुळफेक करण्यात आली. गावातील कोतवाल खुदा शेख यांनी चुकीचे फेर टाकून दिशाभूल केली आहे. गेल्या चार पिढ्या पासून ही जमीन कसत असल्याचे पाचारणे यांनी निवेदनात म्हंटले आहे. 

या सर्व प्रकरणाची चौकशी करुन महसुल अधिकारी, कर्मचारी, एजंट व बनावट खरेदीखत करुन देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी. दोषी तलाठी व मंडलाधिकारी यांचे निलंबन करावे. तसेच फेरफार क्र.1012 व 1019 त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण चालूच ठेवण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.