नगर तालुका राष्ट्रवादीची जंम्बो कार्यकारणी जाहिर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची जंम्बो कार्यकारणी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आली. यावेळी आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, किसनराव लोटके, अशोक बाबर, माजी जि.प. उपाध्यक्ष सुजित झावरे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ (दादा) दरेकर, दादासाहेब कासार, मनोज भालसिंग आदि उपस्थित होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादीच्या जिल्हा पक्ष कार्यालयात सदर कार्यकारणी नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ (दादा) दरेकर यांनी जाहिर केली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. प्रास्ताविक मोहन बोठे यांनी केले.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राबविलेल्या धोरणांनी शेतकर्‍यांच्या सर्वांगीन विकासाला चालना मिळाली. मात्र सत्तेवर असलेल्यांनी शेतकरी विरोधी धोरणाची अंमलबजावणी केल्याने शेतकर्‍यांपुढे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. नगर तालुक्यात दादा दरेकर यांच्या माध्यमातून उत्तम संघटन झाले आहे. उत्सफुर्तपणे युवक राष्ट्रवादीत सक्रीय होत आहे. 

सर्व समाजाला बरोबर घेवून राष्ट्रवादीचे कार्य चालू असून, वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांचे मुलभुत प्रश्‍न केंद्रबिंदू मानून ते सोडविण्यास पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. आ.संग्राम जगताप यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधत घोषणांचा पाऊस पाडला जातो. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले. शेतकर्‍यांसह सर्वांना दिशाभुल करणारे सरकार सत्तेवर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर तालुका राष्ट्रवादीची जाहिर करण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे 
तालुका सरचिटणीस- संदीप गोरे (रुईछत्तीशी), मनोज मदणे (निंबळक), अनिल नरवडे (टाकली खातगाव), रामेश्‍वर काळे (दशमीगव्हाण), शरद कोतकर (राळेगण), किरण ठुबे (जाधववाडी), दिनेश बोठे (शहापूर), तालुका उपाध्यक्ष- भरत गव्हाणे (आंबिलवाडी), मोहन बोठे (वाळकी), शामराव कांडेकर (हमिदपूर), शरद बडे (मेहेकरी), अमोल शिंदे (इसळक), राहुल आल्हाट (पिंपळगाव उज्जनी), दादासाहेब कासार (वाळकी), तालुका चिटणीस- भाऊसाहेब शिंदे (हातवळण), निसार पठाण (हिंगणगाव), भाऊसाहेब कदम (निमगाव वाघा), किशोर रोहोकले (शिराढोण), रामदास भालसिंग (वाळकी), सागर हराळ (गुंडेगाव), तालुका संघटक- बापूसाहेब शेळके (गुणवाडी), प्रकाश घोरपडे (केकती), तालुका कार्याध्यक्ष- अशोक कोकाटे (चिचोंडी पाटील), मोहनतात्या गहिले (अरणगाव), सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष- अक्षय भिंगारदिवे (दरेवाडी), उपाध्यक्ष- हर्षल कांबळे (चिचोंडी पाटील).

राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष- मनोज भालसिंग (वाळकी), उपाध्यक्ष- सागर गोरे (दहिगाव), महेश निमसे (मांडवा), राहुल पुंड (नेप्ती), अतुल भापकर (गुंडेगाव), श्रीकांत शिंदे (निंबळक), श्याम कांबळे (दशमी गव्हाण), शुभम शेळके (चिचोंडी पाटील), सागर निंबाळकर (निंबोडी), श्याम कांबळे, शुभम शेळके (चिचोंडी पाटील), कार्याध्यक्ष- सतीश म्हस्के (रुईछत्तीशी), दिलीप साठे (नारायणडोह), संघटक- दिलीप लाळगे (हातवळण), तुकाराम भापकर (गुंडेगाव), सरचिटणीस- रोहिदास साके (हातवळण), निकेतन लोटके (खंडाळा).

तालुका सेल महिला अध्यक्ष- विद्याताई बोर (अकोळनेर), सेवा दल अध्यक्ष- बाबासाहेब सय्यद (रतडगाव), अल्पसंख्यांक अध्यक्ष- पापामियॉ पटेल (भातोडी), डॉक्टर सेल अध्यक्ष- डॉ.आबासाहेब दरेकर (शिराढोण), वकिल सेल अध्यक्ष- अ‍ॅड.सुरेश ठोकळ (कामरगाव), अपंग सेल अध्यक्ष- सुनिल ढवळे (पिंपळगाव कौडा), किसान अध्यक्ष- गोरख सुपेकर (खंडाळा), सोशल मिडीया- राहुल अरडे (वाळकी), ज्येष्ठ नागरिक- तात्यासाहेब दरेकर (वाळूंज), ओबीसी सेल अध्यक्ष- अशोक शिंदे (साकत), सहकार अध्यक्ष- अशोक शिंदे, ग्रंथालय विभाग- विकास मोरे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.