श्रीरामपूरमध्ये पॉलिशच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लांबविल्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोन्यांचे दागिने पॉलिश करून चमकवून देतो, असे सांगून दोन भामट्यांनी श्रीरामपूर शहरातील वार्ड क्र. १ मधील महिलेच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : शहरातील रेल्वे मालधक्क्यासमोरील महात्मा हौसिंग सोसायटी क्र. २ मध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा राजेंद्र बेणकर या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घरात एकट्याच होत्या. त्यावेळी दोन भामटे त्यांच्या घरी आले. त्यांनी तुमच्या सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देतो, असे सांगून सोन्याच्या बांगड्या घेऊन पातेल्यामधील रंगीत पाण्यात हात ढवळून ते पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, दोघा आरोपींनी सोन्याच्या बांगड्या घेऊन निघून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र खंडबा बेणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरूद्ध भा.दं.वि. कलम ३७९, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पगारे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.