जनसेवेसाठी माझी ओपीडी 24 तास सुरूच : आ. शिवाजी कर्डिले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनसेवेसाठी माझी ओपीडी 24 तास सुरूच असून जनतेच्या मूलभूत गरजा सोडविण्यासाठी व विकासात्मक कामाला अग्रक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. तमनर आखाडा येथील मोठ्या बाबा महादेव मंदिराच्या सभामंडपाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आ. कर्डिले म्हणाले की, मी सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे. त्यांच्या सेवेसाठी माझी ओपीडी 24 तास सुरू आहे. मी लोकांच्या सुख-दुःखात कायम सहभागी असतो. विकासकामात मी स्थानिक राजकारण आणत नाही. सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत जनतेच्याच कामात असतो. स्वकर्तृत्वाला महत्त्व देतो. वाडवडिलांच्या पुण्याईवर मते मागण्याचे आजचे दिवस नाही. जो काम करतो त्याला जनता विसरत नाही, असे त्यांनी विरोधकांना चिमटे काढले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रास्ताविकात प्रा. संजय तमनर यांनी गावातील सर्व कामांचा आलेख मांडून आभार मानले. ढोकणे यांनी आमदार साहेबांची कामाची पद्धत विशद करून भविष्यात त्यांच्याच पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी सरपंच हिरामन तमनर, गोरख तमनर, अण्णासाहेब तमनर, गोपीनाथ कोपनर, नारायण कोपनर, अशोक तमनर, विक्रम तमनर, मच्छिंद्र तमनर, काशिनाथ तमनर, दादाराम तमनर, गजानन तमनर, पोपटराव तमनर, सूर्यभान तमनर, राजेंद्र तमनर, बाबासाहेब तमनर, सीताराम तमनर, आदींसह गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन आप्पासाहेब तमनर व आभार प्रा. संजय तमनर यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.