अट्टल वाहनचोर शिर्डी पोलिसांच्या सापळ्यात अडकला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी परिसरात वाहन चोरणारा अट्टलचोर अंकुश पवार यास शिर्डी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.दि.23 रोजी शिर्डी परिसरात एक अट्टल वाहन चोर व दरोड्यातील आरोपी मोठ्या स्वरूपाचा गुन्हा करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिर्डी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांना ही माहिती देण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कहाळे, पो. ना. बैसाणे, पो. कॉ. शेलार, पो. कॉ. पळसे यांना साध्या वेशात शिर्डी-राहाता शिव येथे सापळा लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सापळा लावून आरोपीवर लक्ष ठेवण्यात आले.

यावेळी आरोपी अंकुश परशुराम पवार (वय 21) रा. एकरुखे, ता. राहाता हा दुचाकीवर (करिझ्मा) क्रमांक एम. एच. 20 सी. झेड. 3467 भरधाव शिर्डीकडे येत होता. त्यावेळी सावध असलेल्या पोलीस पथकाने त्याला शिताफीने पकडले. त्याला शिर्डी पोलीस ठाण्यात आणून अधिक विचारपूस केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची माहिती समोर आली. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात ट्रॅक्‍टर चोरीचा चार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात ट्रक चोरीचा गुन्हा दाखल आहे. नगर जिल्ह्यातील राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सत्य समोर आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आरोपीच्या ताब्यात मिळालेली मोटारसायकलसुद्धा चोरीची असल्याबाबत माहिती मिळाली. औरंगाबाद येथील सर्व ट्रॅकटर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी फरार असून शिर्डी पोलिसांच्या सतर्केतेमुळे परिसरात होणाऱ्या संभाव्य गुन्ह्याला आळा बसला आहे. शिर्डी पोलीस त्याची कसून चौकशी करत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप कहाळे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.