महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जेवणाचे पैसे मागितल्या कारणाहुन वापरण्यास दिलेली गँस टाकी परत दे असे म्हणत निमशेवडी येथील दोघांनी एका महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी चांगदेव रायभान गाडेकर, आप्पासाहेब मते यांच्यावर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी पसार झाले असून शिर्डी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,दि. २२ जानेवारी सायं. ७।। वाजेच्या सुमारास निमगाव येथील हॉटेल गोकुळ ढाबा येथे चांगदेव रायभान गाडेकर,आप्पासाहेब मते (रा.निमशेवडी) यांच्याकडे जेवणाचे पैसे फिर्यादीने मागितले असता आरोपींनी सदर महिलेस वापरण्यास दिलेली गॅस टाकी परत दे असे म्हटले. यावर सदर महिलेने गॅस आजच भरला आहे. नंतर देते असे सांगितले असता आरोपी गाडेकर याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच आरोपी मते याने हात ओढुन शिवीगाळ केली. याबाबत सदर महिलेने शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून शिर्डी पोलिसांनी या आरोपींविरोधात गु.र.नं. २०/ २०१८ भा.दं.वी. ३५४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आरोपी फरार झाले असून शिर्डी पोलीस शोध घेत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रावसाहेब शिंदे करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.