पालकमंत्री राम शिंदेंच्या प्रयत्नांतून अखेर कृषी महाविद्यालय जामखेडमध्ये !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाबाबत जनतेमध्ये तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी सर्व सोपस्कार पार पाडत हळगावला कृषी महाविद्यालयाची मुहर्तमेढ रोवली आहे. कृषी महाविद्यालयाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरून महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय मंजुऱ्या दि. 22 रोजी झालेल्या बैठकीत मिळविल्या असून त्याचा शासन निर्णयही (जीआर) निघाला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत शासन निर्णय घेताना राज्य सरकारने उपलब्ध जागेचा विचार करून हळगावला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर राज्यातच नव्हे तर देशातील अवर्षणप्रवण व दुर्गम भागात अशी नवी संस्था स्थापन करणे ही बाब सर्वांसाठी न्याय देणारी, विकासास पुरक ठरणारी व समतोल क्षेत्रीय विकास साध्य करणारी आहे. त्यामुळे वरील बाबींचा सर्वकष पुर्नविचार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
जामखेड तालुक्‍यातील हळगाव येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय 28 जून 2016 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यानंतर 5 जुलै 2016 रोजी शासन निर्णयही झाला. या शासन निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर खंडपीठाच्या 5 जुलै 2017 रोजीच्या आदेशानुसार शासनाचा 5 जुलै 2016 चा शासन निर्णय अस्तित्वात राहिला नाही. यानंतर राज्य मंत्रीमंडळाच्या 21 डिसेंबर 2017 रोजीच्या बैठकीत हळगावला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला. या विभागाचे सहसचिव दे. आ. गावडे यांनी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.