“नो बॉल’ टाकल्याच्या कारणावरून गव्हाणेवाडीत गोळीबार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्‍यातील गव्हाणेवाडी येथे क्रिकेट सामन्यात “नो बॉल’ टाकल्याच्या कारणावरून मंगळवारी दुपारी दोन गटात मारामारी झाली. त्यानंतर काही वेळातच गोळीबार झाला. या गोळीबारात निलेश काळे व दादा गव्हाणे हे जखमी झाले आहेत. काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गव्हाणेवाडी गावातील मोटेवाडी येथे ओम साई तरुण मंडळाने क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. सामन्यात मंगळवारी दुपारी “नो बॉल’वरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दादा गव्हाणे याने निलेश काळे याचा मावस भाऊ अक्षय काळे याला मैदानात मारहाण केली. त्यावरुन दोन गटात तुंबळ मारामारी झाली. ही घटना दुपारी अडीच वाजता झाली. या हाणामारीनंतर ओमसाई तरुण मंडळाचे कार्यकर्ते पळून गेले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

हाणामारीनंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निलेश काळे व दादा गव्हाणे हे गावठी कट्टे घेऊन समोरासमोर भिडले. एकमेकांवर समोरासमोर गोळीबार केला. यात निलेश काळे याला छातीवर गोळी लागली असून त्याला पुणे येथे उपचारासाठा नेण्यात आले. दादा गव्हाणे याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केल्याने तो जखमी झाला. शिरुर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.