तेराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : तेराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून कोहिनूर मंगल कार्यालय परिसरास स्व.राजीवजी राजळे साहित्यनगरी व विचारपीठास स्व.शंकरराव घुले विचारपीठ असे संबोधण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शनिवार दि.२७ व रविवार दि.२८ जानेवारी रोजी अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात संमेलनाध्यक्ष जेष्ठ कथाकार भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या संमेलनाचे उद्घाटन माजी न्यायमुर्ती बी.जि.कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे,तत्पूर्वी स.१० वा स्व.रावसाहेब पटवर्धन स्मारक येथून लोकसाहित्य जागर यात्रा निघणार असून शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, साहित्यिक, कलावंत सहभागी होणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर च्या महापौर सौ.सुरेखाताई कदम,आमदार मोनिकाताई राजळे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम,श्रमिकविश्व औरंगाबाद चे संपादक प्रा.राम बाहेती,ज्ञानदेव पांडूळे,बाराव्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक शिंदे ई मान्यवर उपस्थित राहणार आहेत,

दु.१२ वा. “जाती धर्माच्या अस्मितेचे राजकारण प्रगतीला मारक आहे.” या विषयावर प्रा.डॉ.जयदेव डोळे,औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यामध्ये कोपरगाव चे नगराध्यक्ष विजय वहाडणे,लहू कानडे, प्रा.डॉ.शरद गायकवाड,कोल्हापूर,प्रा.डॉ.मिलिंद कसबे,नारायणगांव हे सहभागी होत आहेत.दु.१ वा.प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.भाऊसाहेब सावंत यांचे कथाकथन होणार आहे.

दु.२ वा.महाराष्ट्रची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या मध्ये शाहीर शेषराव पठाडे,औरंगावाद,हमीद सय्यद,विनोद ढगे,जळगाव,दिलीप शिंदे, काष्टी,शाहीर भारत गाडेकर,वसंत डंबाळे,जनार्धन बोडखे,दिगंबर बोडखे सहभागी होणार आहेत. दु.२.३० वा.’लेखक आपल्या भेटीला’ अंतर्गत गीतकार प्रकाश घोडके,कथाकार संजय कळमकर यांच्या महेंद्र कुलकर्णी,संजय आढाव,प्रा.रवींद्र सातपुते दिलखुलास मुलाखती घेणार आहेत.

दु.३.३० वा.प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,आष्टी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन होणार असून गणेश मरकड,वसंत मुरदरे,डॉ.बाबुराव उपाध्ये,स्वाती पाटील,नागेश शेलार,महेश देशपांडे,साहेबराव ठाणगे,प्रशांत वाघ,संदीप ढाकणे,अमोल आगाशे,चंद्रकला आरगडे,डॉ.कैलास दौंड,शर्मिला गोसावी,विष्णू सुरोसे,प्रभाकर शेळके, हरिचंद्र पाटील,अशोक निंबाळकर,टी.एन.परदेशी,संभाजी जोगदंड,हुमायून अत्तर,एस बी,शेटे,सुनिता काट्म,लक्ष्मण खेडकर,दशरथ शिंदे,रवींद्र मालुंजकर,हरीश हातवते, सुभाष सोनवणे आदी सहभागी होणार आहेत.

साय.५ वा.माजी खा.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप व पुरस्कार वितरण होणार असून यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप,माजी आमदार दादाभाऊ कळमकर,हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाशतात्या घुले,कॉ.बाबा आरगडे ई मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी साहित्यिक व साहित्य रसिकांनी साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक सुनील गोसावी,कार्याध्यक्ष भाऊसाहेब सावंत,भारत गाडेकर,डॉ राधाकृष्ण जोशी,अजयकुमार पवार,बबनराव गिरी, हर्षल आगळे,राजेंद्र फंड,किशोर डोंगरे,रवींद्र दानापुरे,अशोक गायकवाड,डॉ.दिंगबर सोनवणे,माजी नगरसेवक अशोक कानडे,सुनीलकुमार सरनाईक, सिराज शेख,यांनी केले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.