स्व. राजीव राजळेंची विकासाची संकल्पना राबविणार - आमदार मोनिका राजळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्व. राजीव राजळे यांनी व आमच्या कुटुंबाने विकास व सामाजिक कार्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. विकासाच्या कामात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. जनेतेने सुखव दु:खात दिलेले प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. राजीव राजळेंची विकासाची संकल्पना अधिक प्रबळपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. सुसरे येथे एक कोटी बावन्न लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी राजळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठनेते बबनराव वीर होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या वेळी सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, काशीबाई गोल्हार, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, गोकुळ दौंड, भाजपाचे ज्येष्ठनेते दिनकर गर्जे, सरपंच दत्तात्रय कंठाळी, उपसरपंच लताबाई उदागे, छायाताई पवार उपस्थीत होते. या वेळी बोलताना राजळे म्हणाल्या, स्व. राजीव राजळे यांचा विकासाचा व वैचारिक वारसा जपण्याचे काम करू. सुखात अनेकजण असतात. मात्र, दु:खात आपली कोण व परकी कोण, हे कळते. राजळे कुटुंबाला दु:खात साथ देणारी जनता ही जनार्धन आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून हा वसा जपणार.

यावर्षी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. अनेक गावांच्या नदीपात्रात सुमारे 150 साखळी बंधाऱ्यांची मालिका जलयुक्तच्या माध्यमातून साकारली. अप्रत्यक्ष सिंचन स्रोताला बळकटी मिळाल्याने ही जलक्रांती झाली. वाटर कप स्पर्धेत निवड झालेल्या ७५ गावच्या सरपंच ग्रामस्थांनी त्यात कृती सहभाग नोंदविला आहे. मुळा पाटचारी आवर्तनातही टेल टू हेड ही वितरण प्रणाली शेतीपुरक ठरत आहे. शासनाची ही कार्यप्रणाली लोकमानस जपणारी आहे. निधीला साजेशी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशी तंबीही राजळेंनी दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
थाळी फेक क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल प्रिया खरात हिला सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक केशव पवार यांनी केले. सेवा संस्थेचे चेअरमन राम उदागे यांनी आभार मानले. प्रा. शरद मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी राजेंद्र साप्ते, अमोल नलवडे , रामदास काकडे, बाबासाहेब कचरे ,कल्याण शेळके, कानिफ पाठक, जे. बी. वांढेकर, विनायक घाडगे, राधाकिसन कंठाळी, एकनाथ उदागे, गटविकास अधिकारी जगदीश पालवे, अशोकराव उदागे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.