संगमनेर मध्ये सरपंचाच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे मागील भांडणाच्या कारणावरुन दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाणीत सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे व त्यांच्यासोबत असणारे साक्षीदार या दोघांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गटातील सहाजण जखमी झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांसंदर्भात तालुका पोलिसांत परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत सरपंच संदीप घुगे व साक्षीदार असे दोघे शेजारी राहत आहेत. हे दोघेही मोटारसायकलीवरुन गावातील मारुती मंदिरासमोर रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आले होते. त्याच दरम्यान विठ्ठल बाबाजी नागरे, सदाशिव नाना वनवे, विजय विठ्ठल नागरे, अभिषेक सदाशिव वनवे, कुसूम भिमराज नागरे, पद्मा दिनकर आंधळे या सर्वांनी गैरकायद्याची मंडळी त्याठिकाणी जमवली होती.

या सर्वांनी मागील भांडणाच्या कारणावरुन घुगे व साक्षीदार यांच्या अंगावर रॉकेल ओतून काडीने पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घुगे यांची मोटारसायकलही पेटवून देण्यात आली. त्यामुळे घुगे यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सरपंच संदीप घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दुसऱ्या घटनेत मालुंजे गावातील सदाशिव वनवे हा घराच्या समोर उभा असतांना गावचे सरपंच संदीप घुगे, भाऊसाहेब घुगे, प्रदीप घुगे, अमोल डोंगरे, विजय डोंगरे, मारुती नागरे, शैलेश नागरे, अमित घुगे, संदीप सांगळे, मंगेश नागरे, दीपक डोंगरे या सर्वांनी मिळून वनवे याच्या घरात घुसून इंद्रायणी नाना वनवे, विठ्ठल बाळाजी नागरे, विजय विठ्ठल नागरे, पद्मा दिनकर आंधळे, रामभाऊ कारभारी नागरे, भिमबाई विठ्ठल नागरे यांना राजकीय वादाचा राग मनात धरुन गज, काठ्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत सदाशिव वनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.