श्रीगोंदा तालुक्यातील भानगावमध्ये विवाहितेची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील विवाहिता विद्या रमेश गोरे वय २५, हिने सोमवार दि. २२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मयत मुलीच्या वडिलांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत विद्या हिचा पती रमेश सुदाम गोरे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पेडगाव येथील कुंडलिक विठोबा गरदाडे यांची मुलगी विद्या हिचा तीन वर्षांपूर्वी भानगाव येथील रमेश सुदाम गोरे याच्याशी विवाह झाला होता. या दोघांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. परंतु विद्या हिच्या पतीस दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन खूप त्रास द्यायचा. शिवीगाळ,दमदाटी करून प्रसंगी मारहाण देखील करत असे. 

काही वर्षांपूर्वी रमेश गोरे याने पेडगाव येथे विद्या या माहेरी असताना आई वडिलांसमोर विद्यास मारहाण केली होती. तेव्हा काही नातेवाईकांनी पती गोरे यांना समजावून सांगितले होते. परंतु त्याच्यात काही बदल झाला नाही मयत विद्या हिने पती रमेश हा आपणास कायम मारहाण करतो जीवे ठार मारण्याची धमकी देतो असे माहेरी सांगितले होते. त्यावर विद्या ही काही दिवस पेडगाव येथे माहेरी येऊन राहिली. दि.१८ रोजी पती रमेश हा विद्याला नेण्यासाठी पेडगावला गेला असता, त्याने विद्याला मारहाण करून भानगावला घेऊन गेला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सोमवार दि.२२ रोजी विद्या यांच्या वडिलांना त्यांची मुलगी विद्या ही विहिरीत पडून मरण पावल्याची माहिती समजली. त्यावर मयत विद्या हिच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन विद्याचा पती रमेश सुदाम गोरे हा वेळोवेळी विद्या हिला मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत असे. त्यामुळेच आपली मुलगी विद्या हिने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्यामुळे .आरोपी रमेश सुदाम गोरे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.