नगर-मनमाड रोडवर मोटारसायकल-पिकअपचा अपघात,एकाची प्रकृती गंभीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड रोडवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विरुद्ध दिशेने जाणा-या पिकअप व्हॅनने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे़ त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.जखमी तरुण वरवंडी (ता. राहुरी) येथील असल्याचे सांगण्यात येते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी, राहुरीकडून नगरच्या दिशेने हे दोघे तरुण मोटारसायकल (क्रमांक एमएच- १७, एल ९७९३) वरुन जात होते. त्यांची मोटारसायकल राहुरी कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर आली असताना विरुद्ध दिशेने जाणा-या एमएच-१७, टी-७५८० या पिकअपने या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघाही तरुणांच्या डोक्याला मार लागला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.