पक्ष निरीक्षकांच्या माध्यमातून आगरकर गटाला गांधींकडून शह !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय जनता पक्ष शहरजिल्हा अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी काही महिन्यापूर्वी शहरातील केडगाव व भिंगार मंडळांच्या अध्यक्षांच्या केलेल्या नियुक्तीवरून निर्माण झालेलें वाद आज उत्तर विभागाचे संघटन सरचिटणीस व पक्ष निरिक्षक किशोर काळकर यांनी मिटवला आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
खासदार गांधी यांनी केलेल्या नियुक्तींवर शिक्कामोर्तब केला आहे. किशोर काळकर यांच्या उपस्थितीत खासदार गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत काळकर यांनी या महत्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून केडगाव मंडळ अध्यक्ष शरद ठुबे, भिंगार मंडळ अध्यक्ष शिवाजी दहीहंडे व मध्य मंडळ अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांचा पुष्पगुष्च देऊन सत्कार केला. हा शिक्कामोर्तबमुळे ॲड. अभय आगरकर यांच्या गटाला मोठा हादरा बसला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सामाजिक ऐक्य कायम राहावे यासाठी २६ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात पक्षातर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा झेंड्याखाली सर्व जनतेला एकत्र आणायचे आहे. नगर मध्येही खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे नियोजन चालू आहे. शहरातील पक्षाचे काम चांगले चालू असल्याचे कौतुक केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.