लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखेंची जनसंपर्क मोहीम सुरू !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोकसभा निवडणुकीसाठी दीड वर्षाचा अवधी असला तरी आतापासून डॉ.सुजय विखे यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या दक्षिण नगर जिल्ह्यात असलेल्या जुन्या निष्ठावंताबरोबरच नव्या कार्यकर्त्यांना घेऊन डॉ. विखे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय पक्का केला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
डॉ. विठ्ठलराव विखे मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून दक्षिण लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांमध्ये सर्व रोग निदान शिबिरे सुरू करून स्व. विखेंचा उद्देश सफल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती डॉ. सुजय विखे यांनी पाथर्डीत बोलताना देत दक्षिण जिल्ह्याची संपर्क यात्रा खऱ्या अर्थाने सुरू केली आहे.

गेल्या महिन्याभरापासून हालचालींना मोठा वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय यांनी विळद घाट येथे दक्षिण नगर जिल्ह्यातील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील राजकीय परिस्थितीबरोबरच छोट्या-मोठ्या गोष्टी जाणून घेतल्या. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रत्येक तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार असून, त्यासाठी प्रत्येक तालुक्याला त्यांनी एक दिवस दिला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात पाथर्डी, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगाेंदे, कर्जत व जामखेड हे तालुके आहेत.या सर्व तालुक्यातील निवडक पदाधिकारी डॉ. सुजय यांच्या संपर्कात आहेत.

आगामी मनपा निवडणुकीत विखे पॅटर्न !
लोकसभेसाठी सर्वाधिक मतदार हे नगर शहर व जिल्ह्यातील असणार आहेत. त्यामुळे त्यांनी नगर शहरातील पदाधिकाऱ्यांबरोबर प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत विखे पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली देखील सुरू केल्या आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.