प्रा.राम शिंदेंच्या हट्टामुळे मुख्यमंत्री फडणवीस अडचणीत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-औरंगाबाद खंडपीठाने दि. २१ जुलै २०१७ रोजी हळगाव कृषि महाविद्यालयाची ५ जुलै २०१६ रोजी दिलेली परवानगी रद्द करून , श्रीगोंदा आणि हळगाव या दोन प्रस्तावांची नव्याने छाननी करून त्यामधील उच्च गुणवत्तेचा प्रस्ताव मंजूर करावा असे आदेश दिलेले असतांना या आदेशाची पूर्तता न करता पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी १ जानेवारी २०१८ रोजी हळगाव येथे कृषि महाविद्यालयाचे उदघाटन केले, ही बाब उच्च न्यायालयाचा अवमान करणारी आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीगोंद्याच्या कृषि महाविद्यालयाचा तातडीने निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली आहे. यामुळे हे उदघाटन पालकमंत्री शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्याही अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्राचे कृषि विभागाचे मुख्य सचिव यांनी दि. ६ जुलै २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लिहून दिले आहेकी, श्रीगोंदा आणि जामखेड ( हळगाव ) येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावाची महाराष्ट्र कृषि विद्यापीठ कायदा १९८३ मधील तरतुदीनुसार वैधानिक अधिकाऱ्यांकडून छाननी करून , जमिनीसह इतर घटकांची उपलब्धता विचारत घेऊन कृषी महाविद्यालयाचा अंतिम निर्णय, पूर्वीच्या निर्णयाच्या प्रभावाशिवाय घेतला जाईल .

मुख्य कृषिसचिवाच्या म्हणण्यानंतर उच्च न्यायाने स्पष्टपणे आदेश दिले आहेत की , शासनाला आपल्या इच्छेनुसार कृषि महाविद्यालयाची जागा निवडता येणार नाही व स्थानिक लोकप्रतिनिधी अगर मंत्री यांचा प्रभावही विचारात घेतला जाऊ नये. असे आदेश असतांना विद्यापीठ कायद्यातील तरतुदी आणि कमिटीचा अहवाल विचारात न घेता मुख्यमंत्र्यांनी १ जानेवारी २०१८ रोजी हळगाव येथे कृषि महाविद्यालयाचे भूमिपूजन केलेले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

हळगाव कृषि महाविद्यालयासाठी आतापर्यंत संबधित विभागाचा प्रस्ताव नाही. कृषि विद्यापीठाच्या समितीची शिफारस नाही, वित्त व नियोजन विभागाची मान्यता नाही, निधीची तरतूद नाही, असे असताना ४२ कोटी अंदाजित किमंत असणा-या हळगाव कृषि महाविद्यालयाच्या भूमिपूजनाची अतिघाई कशासाठी करण्यात आली ? असे प्रश्न आता मंत्रालयातील प्रशासकीय अधिकारीच विचारीत आहेत. 

नागपूर अधिवेशन चालू असतांना नागपूर विधानभवनात दि. २१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घाईगडबडीने हळगाव कृषि महाविद्यालयाला मंजूरी घेण्याचा प्रयत्न केला असला तरी अदयाप त्याला मंजुरी मिळालेली नाही व शासनाच्या वेबसाईटवर इतिवृत्त टाकलेले नाही. इतिवृत्त अंतिम झाले नसल्याची टीप आजही वेब साईटवर दिसते. 

कृषि महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया परिपूर्ण नसल्याने सदरच्या प्रस्तावावर अंतिम मान्यतेची सही करण्याचे धाडस प्रशासकीय अधिकारी करीत नाहीत, त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे अडचणीत सापडले आहेत. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना डावलून, कृषि विद्यापीठ कायद्यातील तरतुदी डावलून आणि श्रीगोंदा कृषि महाविद्यालय डावलून निर्णय घेतल्यास सर्व संबधिंतावर न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली जाईल असेही प्रा. दरेकर म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.