वराळ हत्येप्रकरणी निघोजमध्ये कडकडीत बंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांच्या हत्येप्रकरणी निघोज़ ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून काळा दिवस पाळला. वराळ यांच्या हत्येस (दि.21) एक वर्ष पूर्ण झाले, या दुर्दैवी घटनेची आठवण काढत निघोजकरांनी संदीप तू पुन्हा ये, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संदीप पाटील वराळ यांनी गेली दहा वर्षांत केलेल्या सामाजिक, धार्मिक व राजकीय कामांचा गौरव केला. दि. 21 रोजी दिवसभर गाव व परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून संदीप पाटील वराळ यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करून कडकडीत बंद पाळला. 

स्व. वराळ यांच्या संपर्क कार्यालयात ग्रामस्थ व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वराळ यांना श्रद्धांजली अर्पण केली. सायं. सात वाजता संदीप पाटील यांच्या कार्यालयाजवळून कॅंडल मार्चला सुरुवात झाली. नवी पेठ, जुनी पेठ, एसटी बसस्थानक व संदीप पाटील वराळ चौकामध्ये शांततेत कॅंडल मार्चचे विसर्जन झाले. या कॅंडल मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या वेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक हणुमंत गाडे यांना ग्रामस्थांनी निवेदन देऊन वराळ यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना त्वरित अटक करावी अन्यथा एक महिन्यानंतर नगर -पुणे मार्गावर गव्हाणवाडी फाटयाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.