ट्रकचा टायर फुटून एक विद्यार्थी गंभीर; तीन किरकोळ जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या चंदनापुरी-सावरगावतळ रोडवर मालवाहू ट्रकचा अचानक टायर फुटून दगड व माती उडाल्याने पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी गंभीर, तर तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवाहू ट्रक (क्र.एमएच ४२ एके ९४८६) हिच्यावरील चालक (नाव माहित नाही) हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चंदनापुरीमार्गे सावरगावतळच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. चंदनेश्वर विद्यालयाची शाळा सुटल्याने विद्यार्थी आपआपल्या घरी जात होते.

त्याच दरम्यान मालवाहू ट्रकच्या डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे रोडवरील दगड व माती शेजारुन जाणाऱ्या सार्थक श्रीराम नेहे (वय १३), सिद्धार्थ संदीप फापाळे (वय १२), सुजित संतोष थिटमे (वय १२, तिघे रा.सावरगावतळ) व ऋषिकेश विठ्ठल उगले (वय १३, रा.पिंपळगाव माथा) या चार विद्यार्थ्यांना लागली.

या अपघातात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व या सर्व जखमी विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मात्र, यातील गंभीर जखमी असणाऱ्या विद्याथ्र्याला पुढील औषधोपचारासाठी नाशिक येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वसंत फापाळे (रा.सावरगावतळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक आनंद धनवट हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.