श्रीगोंद्यात चिमुरडीला पहिल्या मजल्यावरून फेकणारा गजाआड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या महादेव शेलार यांची लहान मुलगी आरोही (वय, चार वर्षे) हिच्या कानातील सोन्याचे डूल व पायातील चांदीचे पैंजन चोरी करून लवकेश कोकाटे याने या चिमुरडीचा गळा आवळून तिला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची घटना दि.१९ रोजी घडली आहे.यामध्ये ती चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे.दरम्याना श्रीगोंदा पोलिसांनी या घटनेतील आरोपी लवकेश कोकाटे याला २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शिवाजीनगर परिसरात राहणारे महादेव शेलार. यांची चार वर्षांची मुलगी दि.१९ रोजी घराजवळ खेळत असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने उचलून नेले. तिचा गळा नाडीने आवळून, तिच्या गळ्यातील,कानातील सोन्याचे दागिने व पायातील चांदीचे पैंजन काढून घेऊन. तिला इमारतीच्या पाहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिले. वरून खाली पडल्यामुळे ही चिमुरडी बेशुद्ध झाली. मात्र त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ तिला दवाखान्यात दाखल केले. 

याबाबत दि.२० रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने अज्ञात व्यक्तींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोवार यांनी त्यांचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव,पो.कॉ.उत्तम राऊत, प्रकाश वाघ, दादा टाके, रवी जाधव, किरण बोराडे यांना सोबत घेऊन तातडीने तपासाची चक्रे फिरवली असता. त्यांनी काष्टी येथे जाऊन घटनास्थळाच्या आजूबाजूला चौकशी केली असता. त्यांच्या घराशेजारी राहणारा लवकेश ऊर्फ बापू जगन्नाथ कोकाटे यानेच हे कृत्य केल्याची माहिती समजली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यावरून पोलिसांनी कोकाटेला चौकशीसाठी ताब्यात घेतले.मात्र त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याच्या घराची झडती घेतली असता, या जखमी चिमुरडीच्या अंगावरील काही दागिने आरोपीच्या घरात सापडले. त्यावर पोलिसी प्रसाद मिळताच आरोपी कोकाटे, याने आपणच चोरीच्या उद्देशाने नाडीने या मुलीचा गळा आवळून तिला पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याचे सांगितले. तसेच शेतात लपवलेले दागिने देखील त्याने पोलिसांना काढुन दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.