आप आमदारांची अपात्रता, अण्णा म्हणतात मी पहिलेच सांगितले होते !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरविल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आप पक्षावर तोफ डागली आहे. अरविंद केजरीवाल यांना पक्ष बनवू नये, असे मी आधीच सांगितले होते असे अण्णा म्हणाले होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भ्रष्टाचारविरोधी आणि लोकपालच्या नियुक्तीसाठी केजरीवाल हे अण्णा हजारेंसोबत होते. मात्र केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करण्याचे ठरविले तेव्हा दोघांचे रस्ते वेगळे झाले.निवडणूक आयोगाने लाभाचे पद घेतल्याबद्दल दिल्लीच्या 20 आमदारांना शुक्रवारी अपात्र ठरविले. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस आयोगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अण्णा म्हणाले, की पक्ष न बनविण्यासाठी मी केजरीवाल यांना आधीच सांगितले होते. “केजरीवाल यांनी पक्ष बनविला, त्याच वेळेस आमचे रस्ते वेगळे झाले. आता आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही. पक्ष स्थापन करू नका, असे मी केजरीवाल यांना आधीच सांगितले होते. पक्ष स्थापन करून देशासाठी काम करता येत नाही. तसं असतं तर स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी देशाची स्थिती खूप वेगळी असती,” असे ते म्हणाले.दुसरीकडे आपचे नेते कुमार विश्वास यांनीही या निर्णयावर दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल यांनी माझा सल्ला ऐकला नाही, असे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.