राष्ट्रपतींनी साईबाबा जन्मस्थळावर केलेल्या वक्तव्यामुळे शिर्डीकर नाराज.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्यावर्षी १ ऑक्टोबरला साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या उद्धाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आले होते. यावेळी केलेल्या भाषणात कोविंद यांनी, साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी असल्याची भावना अनेक भाविकांची असल्यामुळे राज्य सरकारने पाथरीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद शिर्डीत पाहायाला मिळत आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिर्डीतील साईभक्तांनी राष्ट्रपती कोविंद यांच्या या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त करत आक्षेप घेत, याबाबत साईबाबा संस्थानने अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी लावून धरली होती. आपण लवकरच यासंदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनी बैठकीत दिले आहे.

राष्ट्रपतींनी साईबाबा समाधी शताब्दी समारंभात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटत आहेत. बाबांचा जन्म पाथरी येथे झाला असून गावच्या विकासासाठी सर्वानी परिषद घ्यावी, असे राष्ट्रपतींनी सुचविले होते. पण साईबाबा संस्थानने प्रकाशित केलेले साईचरित्र, खापर्डे डायरी, साईबाबा अवतार आणि कार्य, साईलिलामृत या ग्रंथांमध्येही साईबाबांच्या जात, धर्म, वंश, पंथ आणि जन्माचा उल्लेख नाही, असे असूनही राष्ट्रपतींनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले, या विषयी साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दासगणू महाराज आणि दाभोळकर यांनी लिहिलेल्या साईबाबांच्या चरित्रातही साईबाबांच्या जन्माचा उल्लेख नसल्याचे ग्रामंस्थाचे म्हणणे आहे. जन्मस्थळाचा हा वाद मिटावा, अशी मागणी शिर्डीकर करत आहेत.साईबाबा समाधी शताब्दीच्या वेळी राष्ट्रपतींनी हे विधान केले होते. शिर्डीतील ग्रामस्थांनी त्यांच्या या विधानामुळे संस्थानकडे राष्ट्रपतींच्या भाषणातील वक्तव्याचा खुलासा करण्याची मागणी लावून धरली होती. जन्मस्थळाचा मुद्दा भाषणात आल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरीकर विकास कामांसाठी राज्य सरकारकडे विकासनिधीची मागणी करत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
साईबाबांनी आपल्या जन्माचा, जातीचा अथवा धर्माचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हा संम्रभ दूर व्हावा यासाठी ग्रामस्थ आणि संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्यात अनेकदा चर्चा झाली. अखेर संस्थानने ग्रामस्थांचा रोष पाहता हा वाद मिटावा याकरिता बैठक घेतली. ग्रामस्थांच्या भुमिकेशी आपण सहमत असून लवकरच राष्ट्रपतींची भेट घेऊन माहिती देवू, असे हावरे यांनी स्पष्ट केल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.