शब्दगंध चे राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शब्दगंध साहित्यिक परिषदेची महत्वपुर्ण बैठक राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी तेराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना निमित्त देण्यात येणारे पुरस्कार पोरका बाबु, पाऊस पाणी,जाती अंताचे हुंकार, कार्यकर्त्याची डायरी या पुस्तकांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.परीक्षण समितीचे सदस्य डॉ कैलास दौंड,भाऊसाहेब सावंत,शर्मिला गोसावी,डॉ सुभाष शेकडे, दशरथ खोसे यांनी निकाल सादर केला.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कादंबरी - पोरका बाबु,रामकृष्ण जगताप, श्रीरामपूर, झुंज- गणेश निकम,नेवासा

कथासंग्रह- पंजा व कमल,प्रा साईनाथ पाचारणे, भोर

काव्यसंग्रह- पाऊसपाणी, साहेबराव ठाणगे, मुंबई,

जाती अंताचे हुंकार- डॉ प्रभाकर शेळके,जालना,

बाल कथासंग्रह - बीन भिंतीची शाळा, लता गुठे, मुंबई

बाल काव्यसंग्रह- आमच्या गावात आमची शाळा, बबन शिंदे,हिंगोली

ललित संग्रह- आठवणीतील गुलमोहर, प्राचार्य मंगला पाटील,सातारा

लेख संग्रह - कार्यकर्त्याची डायरी,डॉ चंद्रकांत पुरी,मुंबई

बाल गुन्हेगारी शोध आणि बोध,कैलास मडके,नगर

आरोग्य ग्रंथ - कुष्ठरोग्याचे भावविश्व, डॉ शोभा रोकडे, अमरावती

समीक्षा ग्रंथ- डॉ आंबेडकरांचे विचारधन आणि दृष्टी, प्रा सोमनाथ गुंजकर,डॉ शिवसांब कापसे,नांदेड

संकीर्ण- सूत्र संचालनासाठी ,प्रा रवींद्र मालूजकर, नाशिक

शाल,स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे रविवार दि 28 जानेवारी 2018 रोजी सायं 4,30 वा संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सुनील गोसावी यांनी दिली, पुरस्कर प्राप्त साहित्यिकांचे कविवर्य लहू कानडे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, प्रमोद देशपांडे, ज्ञानदेव पांडूळे, राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.