नगर एमआयडीसीची जलवाहिनी फुटली; शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बाभूळगाव शिवारात सकाळी 6 वाजता नगर एमआयडीसीला मुळा जलाशयातून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या कांद्याचे पाण्याने वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे बाभूळगावात दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी पुरवठा विभागाला कळविले. जलवाहिनी फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार व कृषी विभागाला कळवून जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. नुकासानग्रस्त शेतकऱ्यांना एमआयडीसी प्राधीकरणाकडून नुकसान भरपाई मिळण्याकामी चर्चा केली.संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालकाडे त्याबाबत अर्ज कारावा आपण त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासंदर्भात एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाला कळवू, असे त्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

ही जलवाहिनी मुळा धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी 1981 साली झाली आहे. ही जलवाहिनी जुनी झाल्याने नेहमीच या भागात फुटते. त्यामुळे अनेकवेळा नुकसान होऊन या भागातील शेतकऱ्यांना प्राधीकरणाकडे अर्ज करूनही कुठलीच भरपाई मिळत नसल्याचे अनेक उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी गाडे यांना सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.