प्रेमप्रकरनातून विवाहितेवर चाकूहल्ला करुन एकाची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एका विवाहितेवर चाकूने वार करत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड मधील  कान्होपात्रा भागात रविवारी पहाटे ही घटना घडली. नितीन धोंडे(वय 34, राहणार आष्टी, जि. बीड) असे या मृताचे नाव आहे. हल्ला करण्यात आलेल्या तरुणीच्या पतीने याबाबत जामखेड पोलिसांत फिर्याद दिली.याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शहरातील कान्होपात्रा येथे नितीन धोंडेचा मृतदेह घरात साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याच घरात तरुणी गंभीर जखमी अवस्थेत दिसली. तिला जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

नितीन धोंडेवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. मयत धोंडे हा ठेकेदार म्हणून काम करत असल्याचे समजते. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोकळे, हवालदार बापूसाहेब गव्हाणे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.