अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन संपन्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्रासह देशात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे अनेक कलाकार ग्रामीण भागातून पुढे आलेले आहेत. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये कलाकारांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध होत असतात. अशावेळी ग्रामीण भागातील कलाकारांनाही व्यासपीठ देवून त्यांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. रंगभूमीवर काम करताना अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशी कलात्मक कामे करावी लागतात. त्यासाठी ध्येय निश्चित करून मेहनत घ्यायला हवी. यातूनच मोठे यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते सुनील तावडे यांनी केले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
अनुष्का मोशन पिक्चर्स ऍण्ड एंटरटेन्मेंट व श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. सावेडी रस्त्यावरील माऊली सभागृहात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आ.संग्राम जगताप, श्रीमती आशाताई फिरोदिया, सौ.रिंकू फिरोदिया, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्शल बोरा, स्पर्धेचे परीक्षक प्रवीण तरडे, अमित भंडारी, विकास कदम उपस्थित होते. या स्पर्धेत पहिल्या फेरीत १०० एकांकिका सादर झाल्या होत्या. त्यातील ३० एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या असून त्यांचे सादरीकरण माऊली सभागृहात दि.१४ जानेवारीपर्यंत होणार आहे. या एकांकिकांसाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना अभिनेते तावडे पुढे म्हणाले की, राज्यात होणार्‍या एकांकिका स्पर्धांच्या तुलनेत अहमदनगर महाकरंडक स्पर्धेत पारितोषिकांची रक्कम मोठी आहे. या स्पर्धेतून कलाकारांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळते. याशिवाय पारितोषिकाची रक्कमही फार महत्त्वाची असते. हौशी कलाकारांना आणखी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी पारितोषिकाची रक्कम फायदेशीर ठरते. आपण स्वत: एकांकिका स्पर्धातूनच पुढे आलो असल्याने अशा स्पर्धा कलाकारांसाठी किती प्रोत्साहन देणार्‍या असतात याची आपल्या स्वत:ला जाणीव आहे. सातत्याने अशी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना बळ देण्याचे आयोजकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आ.संग्राम जगताप म्हणाले की, नगरमध्ये अनेक गुणी कलाकार आहेत. या मातीतून असंख्य कलाकार घडले आहेत. योग्य व्यासपीठ व संधी मिळाल्यास नगरमधील कलाकार मोठे नाव कमवू शकतात. अहमदनगर महाकरंडकच्या माध्यमातून अशी संधी हौशी कलाकारांना प्राप्त झाली आहे. या संधीचा फायदा घेत रंगकर्मी भविष्यात मोठी झेप घेतील, असा विश्वास वाटतो.

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, गेल्या सहा वर्षांपासून या स्पर्धेमुळे कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. नगरच्या कलाकारांचा सहभाग असलेल्या माईक, खटारा या एकांकिकांनी महाराष्ट्र गाजवला आहे. सारेगमप या कार्यक्रमात नगरचीच अंजली गायकवाड देशात अव्वल ठरली. नगर शहर हे गुणी कलाकारांचे शहर आहे. नगरकरांसाठी लवकरच ‘आय लव्ह नगर’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याचे ऍप तयार होत असून या माध्यमातून सर्वच नगरकरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कर तांबोळी यांनी केले. स्वप्नील मुनोत यांनी स्वागत केले. अमोल खोले यांनी आभार मानले. स्पर्धेतील एकांकिका १४ जानेवारीपर्यंत सादर होणार असून पारितोषिक वितरण समारंभ याचदिवशी सायंकाळी ५ वाजता प्रसिध्द अभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. अंतिम फेरीतील एकांकिका दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत सादर होत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.