तनपुरे कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागणार - राधाकृष्ण विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सहकार जिवंत राहिला पाहिजे. सध्या साखरेचे दर ढासळत असल्याने राज्यातील साखर उद्योगापुढे भीषण संकट उभे राहिले आहे. साखर कारखानदारांसमोर उसाला कसा भाव द्यायचा हा मोठा प्रश्‍न आहे. सरकारने याबाबतीत भूमिका घेण महत्वाचे आहे. तालुक्‍याची कामधेनू असलेला डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी अनंत अडचणी आल्या. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्याकामी जिल्हा बॅंकेची भरीव मदत झाल्याने या अडचणींवर मात करता आली. पुढील काळात कारखाना सक्षमपणे चालविण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन विधनासभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

राहुरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामसचिवालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विख, आमदार शिवाजी कर्डिले, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जि. प. सदस्य शिवाजी गाडे, पालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, रावसाहेब तनपुरे, पंचायत समिती सभापती मनिषा ओहोळ, डॉ. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे आदी मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.