सी.जी.करंडक क्रिकेट स्पर्धेत अहमदनगरचा साईदीप हिरोज क्रिकेट क्लब विजेता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.मान्यतेने सी.जी.पाँवर अॅण्ड इंडस्ट्रीयल सोल्युशन आयोजित ३२व्या राज्यस्तरीय १९ वर्षी खालील खेळाडूसाठी आयोजित राज्यस्तरीय सी.जी.करंडक क्रिकेट स्पर्धेत अहमदनगरचा साईदीप हिरोज क्रिकेट क्लब विजेता ठरला. प्रमुख अतिथी भारताचे माजी वेगवान गोलंदाज मा. करसन घावरी यांच्या हस्ते विजेत्या संघास करंडक प्रदान करण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी आ. संग्राम जगताप,कंपनी सीईओ श्री.के.एन निळकंठ,उपमहापौर श्रीपाद छिंदम,सी.जी.पाँवर अॅण्ड इंडस्ट्रीयल सोल्युशन लीचे उपाध्यक्ष श्री.एन.रमेशकुमार, सी.जी. पाँवरचे ग्लोबल एच.आर.हेड संजय सिंग, सी.जी.इंडियाचे बिझनेस फायनान्स हेड व्यंकट सुंदरम ,संदीप तांबोळी, प्रा. माणिक विधाते,गणेश गोंडाळ आदी मान्यवर उपस्थितीत होते.

मा. क्रिकेटपटू करसन घावरी म्हणाले कि,नगरमध्ये याच वाडिया पार्कच्या मैदानावर १९७० व ७८ मध्ये रणजी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता व आज त्याच ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून येण्याचे भाग्य लाभले.नगरचे हे मैदान अतिशय भव्य असून या ठिकाणी रणजी क्रिकेट स्पर्धा पुन्हा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.सलग ३२ वर्ष जेथे सी.जी.करंडक क्रिकेट स्पर्धा होते तेथे सर्वांनी एकत्र येऊन टर्फ विकेट करणे आवघड नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आ.संग्राम जगताप म्हणाले कि,नगर मध्ये क्रिकेट जिवंत ठेवण्याचे व उत्तम खेळाडू घडविण्याचे कार्य या सी.जी.करंडक क्रिकेट मुळे शक्य झाले. या स्पर्धेसाठी बाळासाहेब पवार यांचे योगदान व त्यांना कंपनीने दिलेली साथ यामुळे हि स्पर्धा सलग ३२ वर्ष होते व यापुढेही चालू राहील असा विश्वास व्यक्त केला.

सी जी.ग्रुपचे श्री.निळकंठ म्हणाले कि,हि क्रिकेट स्पर्धा कंपनीसाठी नव्हे तर सर्व नगरकरांसाठी महत्वाची असून कंपनी ,कर्मचारी ,क्रिकेट असो.व नगरकरांच्या सहकार्याने आज हि स्पर्धा देशात नावाजली जाते. प्रास्ताविकात सी.जी.पाँवर अॅण्ड इंडस्ट्रीयल सोल्युशन कंपनीचे उपाध्यक्ष श्री.एन.रमेशकुमार म्हणाले की, क्रिकेट असो.चे सहकार्य लाभल्यामुळे सतत ३२ वर्ष हि स्पर्धा होत आहे. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, प्रा.माणिक विधाते, सी.जी. पाँवरचे संजय सिंग यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत संदीप तांबोळी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुलकर्णी यांनी केले.गुणलेखन अजय क्वित्क्र यांनी केले तर अंपायर म्हणून चेतन्य खोलगडे व मीनानाथ गाडीलकर यांनी काम केले. आभार कपिल पवार यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल 
मुले विजयी संघ - साईदिप हिरोज क्रिकेट क्लब (अ.नगर), उपविजयी संघ- बालाजी क्रिकेट क्लब (शिरूर), मॅन ऑफ द मॅच- सारांश भार्गव, मॅन ऑफ द सिरीज- रणजित निकम- बालाजी क्रिकेट क्लब, बेस्ट बॅट्समन- सारांश भार्गव (१८४ रन), बेस्ट बॉलर- अनिकेत सिंग (११ विकेट), बेस्ट फिल्डर- शुभदीप येवलेकर (साईदीप हिरोज)
(१९ वर्षी खालील मुली) विजयी संघ - रामराव आदिक पब्लिक स्कूल श्रीरामपूर .उपविजयी संघ - निऱ्हाळी हायस्कूल पाथर्डी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.