वाहनाच्या धडकेने पुणे-नगर महामार्गावर पादचारी ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अज्ञात वाहनाच्या धडकेने रामदास कृष्णा सुलताने (वय २८), मूळ रा. फुलंब्री (औरंगाबाद ), हल्ली रा. सुपा, ता. पारनेर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पारनेर तालुक्यातील पुणे - नगर महामार्गावर सुपा येथे हॉटेल पंचशीलसमोर दि.१९ रोजी रात्री ९.१५ वा. सुमारास घडला. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी- रामदास कृष्णा सुलताने हे पुणे -नगर महामार्गावरून पायी जात असताना रस्त्याने भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमेश अण्णू पुजारी, रा. सुपा यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. खंडेराव शिंदे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.