आता जनतेनेच ठरवावे, विश्वास कोणावर ठेवायचा - डॉ. सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे सरकार घोषणा करते, कर्जमाफी, अंगणवाडी सेविकांचे मानधनवाढ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचे काय झाले? उद्घाटने करणे हेच भारतीय जनता पक्षाचे काम आहे. अंमलबाजवणी काहीच नाही. आता जनतेनेच ठरवावे, विश्वास कोणावर ठेवायचा. पूर्वीचे सरकार खूप कार्यक्षम होते, असेही नाही; परंतु ते जनतेसाठी निर्णय तरी घेत होते, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कोरडगाव येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विखे बोलत होते. या वेळी ज्येष्ठनेते काशीनाथ लवांडे, मोहन पालवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, कोरडगावचे सरपंच विष्णू देशमुख, सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण काकडे, दामुअण्णा काकडे, रमेश दहिफळे, डॉ. राहुल देशमुख, स्वप्निल देशमुख, वसंत घुगरे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, प्रतीक खेडकर, नासीर शेख, पांडुरंग सोनटक्के,राजेंद्र नांगरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.

या वेळी बोलताना विखे म्हणाले, ज्या जिरायत भागात आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, अशा भागात शिबिराचे आयोजन करून मोफत रुग्णसेवा करण्यासाठी जिल्ह्यात पंच्याहत्तर शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. शिबिराच्या निमित्ताने गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ओळखी होतील. गावोगावचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आगामी काळात मी पाथर्डी तालुक्याच्या प्रत्येक गावामधे जाणार आहे. प्रत्येक गावात जनसेवा युवक फाउंडेशनची संघटना युवकांच्या माध्यमातून उभी करणार आहे. संघटनेत केवळ सदस्य हेच पद राहील. शाखा अध्यक्ष व तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष असे कोणतेही पद त्यामध्ये नसेल. पदामध्ये मला रस नाही. तसेच कार्यकर्ते घडले जावेत, अशी अपेक्षा आहे. मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेत आहे. त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, ते पाहू आणि मगच निर्णय घेऊ. 

पाथर्डीत जनसपंर्क कार्यालय सुरू करून जनतेचे प्रश्न सोडवू. आम्ही बोलू ते करू, एवढेच सांगतो. ज्यांना तुम्ही मते दिली ते आज काय करतात. दिलेल्या वचननाम्याला ते बांधील राहिले का? हे जनतेने समज़ून घ्यावे. या वेळी भाऊसाहेब लवांडे, रामुतात्या देवढे, एकनाथ वाकचौरे, प्रेमचंद खंडागळे, भगवान देवढे, वसंत देशमुख, त्रिंबक देशमुख उपस्थित होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.