अल्पवयीन मुलीच्या अपहरण नाट्याला वेगळी कलाटणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, आज ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात हजर झाल्याने अपहरण नाटयाला वेगळीच कलाटणी मिळाली. याबाबतची माहिती अशी- तालुक्यातील देशमुखवाडी येथील एक मुलगी दि.10 जाने रोजी प्रियकराबरोबर पळून गेली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हे दोघे पुणे व पंढरपूर येथे काही दिवस राहिले. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची फीर्याद दाखल केली. आपल्या प्रियकराविरुध्द वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे समजल्यानंतर ही मुलगी आज़ प्रियकरासह कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. 

व मला पळून नेले नाही तर मी स्वत: त्याच्याबरोबर गेले होते. मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे, असे तिने पोलिसांना सांगितले. त्यावर मुलीचे वडील व नातेवाईकांनी या तरुणाविरुद्ध कडक कारवाई करून मुलीची मेडिकल करण्याची मागणी केली. मात्र, या मुलीने आपली मेडिकल करण्यास पोलिसांना व मेडिकल ऑफिसरला तपासणी स्पष्ट नकार दिला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे पोलिसांचाही नाईलाज झाला. कारवाई टाळण्यासाठी पोलीस विविध कारणे सांगत असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून केला जात होता. 12 वर्षांपुढील मुलीची तिच्या समत्तीशिवाय मेडिकल तपासणी करता येत नसल्याचा कायदा असल्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी सांगितले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला बालसुधारगृहात पाठवविण्यात येणार आहे. मात्र, वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तरुणाला अपहरणाच्या कलमाखाली अटक केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.