श्रीगोंद्यात ट्रॅकरमधून पडून एकाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील रहिवाशी असणारे मजूर उत्तम तुळशीराम साळुंके (वय ४५), यांचा (दि.१९) रोजी सायंकाळी श्रीगोंदा शिवारातील शेंडगेवाडी शिवारात ट्रॅक्टरमधून पडून ट्रेलर अंगावरून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, अजनुज येथील रहिवाशी असणारे व मजूर काम करणारे मयत साळुंखे हे ट्रॅकटरमध्ये चालकाशेजारी बसून श्रीगोंद्याहून लिंपणगावमार्गे अजनूजला जात होते. श्रीगोंदा-काष्टी रस्त्यावरील गाराचा पीर येथे त्यांचा ट्रॅक्टर आला. तेव्हा त्यांचा हात निसटून ते ट्रॅक्टरच्या ट्रेलरखाली पडले. त्यांच्या अंगावरून ट्रेलर गेल्यामुळे साळुंके यांचा जागीच मृत्यू झाले.याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना.बबन तमनर हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.