अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता पाळा सत्यजित तांबे पाटील यांचे आवाहन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद मंगळवारी नगर जिल्ह्यात उमटू लागले आहेत. नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दरम्यान या घटनेतून दलित-मराठा वाद निर्माण करण्याचा धर्मांड शक्तींचा डाव आहे. दलित-बहुजन समाजातील युवकांनी ह्याला बळी पडू नये. फोडा आणि राज्य करा ही यांची जुनी रीत आहे. आपण सर्वांनी मिळून ती हाणून पाडू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता पाळा ! असे आवाहन युवक कॉंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांनी ट्वीटर वर केले आहे.

राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 
भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला. सोमवारी झालेल्या वादामध्ये एका तरुणाचा मृत्यूही झाला.राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात शांतता आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.