राहुरीच्या नगराध्यक्षांनी राबविले स्वच्छता अभियान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील अनेक संघटनानी राहुरी बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मात्र परिसर कधीही स्वच्छ राहात नाही. त्यामुळे काल नवीन वर्षाची सुरुवात करताना राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी नगरसेवक, मुख्याधिकारी, कर्मचारी यांना बरोबर घेऊन राहुरी बसस्थानक परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला असून नगराध्यक्षांनी स्वत: हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राहुरी नगरपालिकेची केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण मोहीम २०१८ अंतर्गत निवड झाली आहे. स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी राहुरी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. काल नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे नवीन वर्षाच्या दिवशी स्वत: हातात झाडू घेऊन सकाळी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार, नगरसेवक, कर्मचारी यांच्यासह पालिकेचे सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन बसस्थानकात आले. त्यांनी स्थानक स्वच्छ करण्यास सुरुवात केली.

या बसस्थानकात असलेली घाण-कचरा व अस्वच्छता पाहून शहरातील अनेक संघटना नेहमी बसस्थानक परिसर स्वच्छता मोहीम राबवतात. एक- दोन दिवस बसस्थानक परिसर स्वच्छ दिसतो; नंतर पुन्हा जैसे थे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बसस्थानक प्रमुख गोसावी यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून बसस्थानक परिसरालगत असलेली मोकळी जागा पालिकेच्या वतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी ही मोहीम राबविताना स्वच्छता सर्वेक्षण मोहीम २०१८ हे फक्त निमित्त आहे. या निमित्ताने संपूर्ण राहुरी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जशी नगरपालिकेची जबाबदारी आहे, तशी शहरातील नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकांनी आपण जसे स्वत:चे घर स्वच्छ ठेवतो, तसे आपण आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील कचरा रस्त्यावर गटारीत अन्यत्र न टाकता तो घंटा गाडीतच टाकण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.