मनपा व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोषी अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहरातील प्रभाग १ व २८ मध्ये झालेल्या पोल फिटिंगच्या कामापोटी सुमारे ४० लाख रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने प्रभाग २८ मध्ये पोल फिटिंगचे काम सुरु केले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
अशा प्रकारे दिवसाढवळ्या जनतेची फसवणूक केली जात आहे.याकामाशी संबंधित असलेल्या अधिकारी व संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत.अशी मागणी माजी नगरसेवक दीपक खैरे आणि शिवसेना शहर उपप्रमुख प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

प्रभाग २८ मधील मल्हार चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्यावरील खड्यांमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून मोठे दगड टाकुन बुजवले, पण त्यावर डांबरीकरण न झाल्याने अनेक अपघात होत आहेत. याची पाहणी तसेच मनपामध्ये ३० डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभामध्ये प्रभाग क्र.१ व २८ मध्ये झालेल्या ट्युबलर पोल फिटिंगच्या कामापोटी सुमारे ४० लाख रुपयांचे बोगस बिले काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने या प्रभागात पोल फिटिंगचे काम सुरु केले. 

एकीकडे निधी उपलब्ध होत नाही म्हणून शहरातील अनेक विकासकामे ठप्पआहेत.आणि दुसरीकडे निधीचा अशा प्रकारे जर दुरूपयोग होत असेल तर नगरचा विकास कसा होणार.त्यामुळे या प्रकरणातील दोषी आणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खैरे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.