मागील भांडणाच्या कारणावरून सिद्धार्थनगरमध्ये तलवारीने हल्ला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागील भांडणाच्या कारणावरुन सिद्धार्थनगरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि.३१) ३० ते ४० जणांच्या जमावाने तलवार, लाकडी दांडक्याने तरुणास जबर मारहाण केली असून याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित कार्यक्रमात किरण रमेश दाभाडे (वय ३९ रा. सिद्धार्थनगर) यांना तेथे काही जणांनी बोलविले होते. पण जुन्या वादामुळे किरणने तेथे जाणे टाळले. तरीही काही मित्रांनी बळजबरी करुन किरणला तेथे नेले. 

रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक विजय राजु पठारे, अजय राजु पठारे, गणेश उर्फ घंट्या अरुण घोरपडे, श्रीकांत अरुण घोरपडे उर्फ खान, सागर पठारे, अभिजीत विठ्ठल वैरागर, विश्वास रामकिसन वैरागर, अनिकेत विठ्ठल वैराळ, गणेश पठारे, आकाश पठारे, आंटा उर्फ अनिल शिंदे, पप्पू उर्फ दीपक काते व इतर ३० ते ४० जणांनी दाभाडे यांना धारदार शस्त्रासह मारहाण केली. 

तसेच यांच्या दोन तोळ्याच्या दोन अंगठ्या, हातातील सात तोळे वजनाची ब्रेसलेट गहाळ झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोसई स्वाती देवडकर या करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.